Tiranga Times Maharastra
. होणाऱ्या पतीसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून, काहींनी तिला ट्रोलही केले आहे.
छोट्या पडद्यावरील शांत, सोज्वळ आणि संस्कारी भूमिकांमुळे गायत्री दातारने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मात्र यावेळी तिची चर्चा अभिनयामुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्टमुळे होत आहे.
फोटो शेअर होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या, तर काहींनी तिच्या निवडीवर टीका करत टोमणे मारले. त्यामुळे “ह्यापेक्षा सरंजामे बरा होता” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळाल्या.
दरम्यान, ट्रोलिंग असूनही गायत्रीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिचे चाहते मात्र तिच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.
